जालना । स्थानिक गुन्हे शाखा व अन्न व औषध प्रशासनाने गुरुवारी(दि. 5) रोजी संयुक्त कारवाई करत चंदन झिरा परिसरातून तब्बल 2 लाख 36 हजारांचा गुटखा जप्त केला आहे.
स्थानिक गुन्हे शाखेस गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, कन्हैयानगर, जालना येथे यासीन किराणा दुकानात अवैधरित्या शासनाने प्रतिबंधीत केलेला गुटखा हा साठवून ठेवलेला आहे. अशा खात्रीलायक माहितीवरून स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व अमलदार यांनी दोन पंचासह मिळालेल्या माहितीच्या ठिकाणी कन्हैयानगर येथील यासीन किराणा व जनरल स्टोअर येथे छापा मारला असता तेथे मोहम्मद मुर्तजा मोहम्मद सफरे आलम (वय 50 वर्ष) रा. कन्हैयानगर जालना हा उपस्थित होता. त्यास रेडचा उद्देश कळवुन त्याच्या दुकानाची पंचासमक्ष झडती घेतली असता त्याच्या दुकानात 2लाख 36 हजार 278 रूपये किंमतीचा शासनाने विक्रीसाठी प्रतिबंधित केलेला पान मसाला, व गुटखा मिळुन आला. त्यावरून अन्न सुरक्षा अधिकारी प्रशांत सुरेश अजिंठेकर यांच्या फिर्यादीवरून पो.स्टे. चंदनझिरा येथे गुरन 03/2023 कलम 59 अन्न सुरक्षा व मानके कायदा 2006 सह कलम 188, 273, 328 भादवी प्रमाणे दाखल आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे शाखेचे पो. निरिक्षक भुजंग, पोउपनि बोंडले, पोहेकॉ कांबळे, पोहेकॉ कायटे, पोहेकॉ गौशिक, पोहेकॉ गडदे, पोहेकॉ तंगे, लोखंडे, चौधरी, मपोना शडमल्लु, पोकॉचेके, पोकॉ सहाने, पोकों भोसले, पोकॉ सरोदे, चापोकॉ पैटणे यांनी केली आहे.