जालना । जालना ते औरंगाबाद हायवे रोडवर देवगाव फाटयाच्या अलिकडे भगवान मते यांचे प्लॉटिंगचे समोरील कच्च्या रोडवर सोमवार( दि.13) रोजी सकाळी 09.30 वाजेच्या सुमारास अंदाजे 25 ते 30 वयोगटातील अनोळखी व्यक्तीला कोणीतरी अज्ञात व्यक्तीनी धारदार वस्तुने छातीवर ठिकठिकाणी भोसकून जिवे ठार मारल्याची घटना ऊघडकीस आली होती. मयताचे नाव शेख फय्याज शेख रईस वय 22 वर्ष रा. शेर सवार नगर जालना असे असल्याचे पोलीस सूत्रांकडून माहीती मिळाली आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलीस अधिक्षक अक्षय शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच जालना उपविभागीय पोलीस अधिकारी निरज राजगुरू, स्था.गु. शाखेचे पो. नि.सुभाष भुंजग, पोलीस निरीक्षक शिवाजी बंटेवाब, यांनी ही घटनास्थळी भेट दिली.
यावेळी फिंगरप्रिंट व फॉरेन्सिक पथकाला सुध्दा घटनास्थळी पाचारण करण्यात आले होते. बदनापूर पोलीस ठाण्याचे सहा.फौजदार सय्यद अफसर सय्यद अजगर हुसेन यांच्या फिर्यादीवरून बदनापूर पोलीस ठाण्यात कलम 302, 201 भादवी नुसार गुन्हा नोंद करण्यात आला. पुढील तपास बदनापूर पोलीस करत आहेत.