मुंबईतून एक धक्कादायक बातमी हाती आली आहे. मुंबईत पतीने आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याने पत्नीसह, सासू आणि दोन मेव्हण्यांनी त्याचावर प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईच्या घाटकोपरमध्ये ही घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंद केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईच्या घाटकोपरमध्ये पतीने आपल्या पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा न दिल्याने पत्नीसह, सासू आणि दोन मेव्हण्यांनी त्याचावर प्राणघातक हल्ला केला. या घटनेने घाटकोपर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशाल नागरे असं पीडित व्यक्तीचं नाव आहे. या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी विशाल नागरे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आह.
या प्रकरणी घाटकोपर पोलिसांनी व्यवसायाने वाहनचालक विशाल नागरे 33 वर्ष याच्या फिर्यादीवरून भारतीय दंड संहितेच्या कलम 323, 324, 427, 504, 506 आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी त्याची पत्नी कल्पना विशाल नागरे, तिची आई शालन लक्ष्मण जाधव आणि तिचे दोन भाऊ सुनील आणि संदीप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. घाटकोपरच्या ३३ वर्षीय विशाल नागरे यांनी लग्नाच्या वाढदिवसाच्याच्या शुभेच्छा न दिल्याने पत्नीसह, सासू आणि दोन मेव्हण्यांनी त्यांचावर प्राणघातक हल्ला कोला. त्यानंतर त्यांनी पोलिसांत धाव घेतली. विशाल यांनी पोलिसांत जाऊन पत्नी कल्पना विशाल नागरे, तिची आई शालन लक्ष्मण जाधव आणि तिचे दोन भाऊ सुनील आणि संदीप यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
तक्रारदार विशाल यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे की, 18 फेब्रुवारी रोजी त्यांच्या लग्नाचा वाढदिवस होता. त्याने पत्नीला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या नाहीत आणि त्यांच्यात भांडण सुरू झाले. दुसऱ्या दिवशी पत्नी कल्पना हिने त्याच्यापासून वेगळे होण्याचा निर्णय घेतला आणि तिच्या आई आणि भावाला बोलावले आणि भांडण झाल्यानंतर त्यांनी त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला.