अंबड : अंबड तालुक्यातल्या गोदी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पाथरवाला बु. परिसरातील गोदा पात्रात तहसीलदार यांच्या पथकांनी वाळू माफियाच्या तीन किन्ही पकडल्या. याचा राग आल्याने आज अंबड तहसीलदार यांच्या दालनात घुसून तहसीलदार कडवकर यांना बेदम मारहाण करून त्यांच्यावर दोघांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना आज दुपारी अडीच वाजल्याचा सुमारास घडली. तहसिल कार्यालयात तहसीलदार यांच्या दालनात ही घटना घडल्याने जिल्ह्यात एकच खबळ उडाली उडाली.
अंबड तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी अंबड पोलीस स्टेशनला दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की दि.22 फेब्रुवारी 2023 रोजी दुपारी 2:30 ते 3 च्या सुमारास तहसीलदार त्यांच्या कक्षात शासकीय कामकाज करीत असतांना पंकज सोळंके याने दालनात न विचारताच प्रवेश केला. त्यावेळी शिपाई विकास डोळसे व जीवन म्हस्के या दोघांनी त्यास थांबविण्याचा प्रयत्न केला. परंतु, कुणालाही न जुमानता पंकज सोळुंके याने आत घुसून तहसिलदार यांना तु माझा फोन का घेत नाही, तु काल आमचे साष्ट पिपंळगाव व गोंदी येथील वाळुसाठा का जप्त केला? तसेच गोंदी पोलीस ठाणे येथे गुन्हा का दाखल केला? म्हणून शिवीगाळ केली. त्याचा आक्रमकपणा पाहुन तसेच मारहाण करण्याचा प्रयत्नात करु लागला. तसेच माझा फेर मंजूर का नाही केला? असे म्हणत दोनवेळा त्याने तहसिलदार यांच्या कानाखाली मारल्या, व खांद्यावरही मारले. यावेळी कार्यालयातील कर्मचार्यांनी त्यास पकडले, एका व्यक्तीने त्यास बाहेर काढले असता पंकजने शिवीगाळ करीत मी तुला बघून घेईन असे म्हणून जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी तहसिलदार कडवकर यांच्या फिर्यादीवरून पंकज सखाराम सोळंके याचे विरोधात भांदवी 353, 323, 332, 352, 504, 506 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असुन पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक योगेश चव्हाण यांचेकडे देण्यात आल्याची माहिती ठाणे अमलदार रविंद्र चव्हाण यांनी दिली.
यावेळी उपविभागीय अधिकारी स्वप्नील कापडणीस, गटविकास अधिकारी विवेक जमदडे, तालुका कृषी अधिकारी सचिन गिरी सह महसूल विभागाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. तसेच आरोपीला तात्काळ अटक करावी व जोपर्यंत आरोपीला अटक करणार नाही तोपर्यंत काम बंद आंदोलन करणार असल्याचे उपस्थित कर्मचार्यांनी सांगितले.
पोलीसांचे वाळु माफीया सोबत आर्थिक हितसंबंध असल्यानेच त्यांची हिंम्मत वाढली असल्याच्या प्रतिक्रीया नागरीकातून दिल्या जात आहेत. अधिकारीच सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनता काय? असा प्रश्न निर्माण झालाय.
गोंदी भागात अवैध धंदे खुलेआम सुरू
गोंदी आणि सर्वांचीच चांदी असे म्हणले जाते, गोंदी भागात सध्या सर्व प्रकारचे अवैध धंदे खुलेआम सुरू आहे. यामधे मुख्य म्हणजे वाळू, दारू, जुगार, गुटखा असे सर्व धंदे खुलेआम सुरू आहे. यावर प्रशासन तेरी भी चूप और मेरी भी चूप च्या भूमिकेत दिसत आहे. यामधे सर्व आपले खिसे गरम करण्याच्या प्रयत्नात आहेत.