नागपूर : घराशेजारील व्यक्तीसोबत वाद असेल तर जरा सांभाळून कारण त्याचा शेवट भयानक होऊ शकतो. अशीच एक घटना नागपुरात घडली. शेजारील व्यक्तीसोबत जमिनीशी संबंधित वाद होता. त्याची झोपडी तिला हवी होती. त्या जागेवर ती ताबा मिळवू इच्छित होती. पण, त्याला ते मंजूर नव्हते. शेवटी वाद झाला. या वादातून त्याने तिला संपवले. झोपडीच्या वादातून महिलेचा चाकूने भोसकत खून केला. ही घटना रामबाग परिसरात घडली. आरती निकोलस असं मृतक महिलेचं नाव आहे. तर बादल कुमरे असं आरोपीचे नाव आहे.यात इमामवाडा पोलिसांनी आरोपी बादलला अटक केली. अशी माहिती इमामवाडाचे पोलीस निरीक्षक राजकुमार वाघमारे यांनी दिली.
नागपूरच्या विमा वाडा पोलीस स्टेशन हळदीमध्ये झोपडीच्या वादातून महिलेची हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात तणावाच वातावरण निर्माण झालं होतं. आरोपी बादलचं घराचं बांधकाम सुरू होतं. अतिक्रमण केलेल्या जागेवर झोपडी बांधली होती. याच जागेसाठी आरती आणि बादलच भांडण झालं. सकाळी झालेलं भांडण दुपारी विकोपाला गेलं. बादलनं सपासप चाकूनं वार करत आरतीला गंभीर जखमी केलं. अखेर उपचारादरम्यान संध्याकाळी आरतीचा मृत्यू झाला. या परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झालीय.
बादलच्या घराचं बांधकाम सुरू होतं. त्यासाठी त्याने झोपडी अतिक्रमीत जागेवर बांधली होती. ही झोपडी मला दे. तिथं मी दुकान लावणार असं आरतीचं म्हणणं होतं. तुम्ही घर बांधलं तिथं शिफ्ट व्हा. या कारणावरून त्यांचा वाद झाला. सकाळी वाद झाला होता. नंतर मध्यस्ती झाली. पण, त्यानंतर तो आला त्याने चाकूने सपासप वार करून आरतीला जखमी केले. आरतीला मेडिकलमध्ये दाखल केल्यानंतर तिचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. छोट्याशा वादातून आरतीचा जीव गेला. त्यामुळं वाद घालताना विचार करणे गरजेचे आहे. नंतर पश्चातापाशिवाय काही राहत नाही.