उल्हासनगर शहरातून एका मोठ्या हत्येची घटना समोर आली आहे. उल्हासनगरमधील बदलापूर रोडवर भररस्त्यात काकानेच पुतण्याची हत्या केल्याचे समोर आले आहे. सकाळी सात वाजताच घडलेल्या या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ माजली आहे.
याबाबत समोर आलेल्या माहितीनुसार, बदलापूर रोडवर प्रॉपर्टीच्या वादातून काका आणि पुतण्यामध्ये मोठा वाद झाला. या वादाचे रुपांतर मोठ्या भांडणात झाले ज्यामध्ये पुतण्या रामपाल करोतीया याने काका मनवीर करोतिया यांची हत्या केली. या हल्ल्यात रामपाल करोतीयाही जखमी झाला असून त्याला मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात दाखल करण्यात आले आहे. याबद्दलची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
घटनास्थळाचा पंचनामा करत पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. सकाळी साज वाजताच घडलेल्या या भयंकर हत्येने सर्वत्र खळबळ माजली आहे. पोलिस या संपूर्ण घटनेचा अधिक तपास करत आहेत.