जालना येथून एक दुखःद घटना समोर आली आहे. काल रामनवमीनिमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीत एका व्यक्तीची हत्या करण्यात आली आहे. नाचण्याच्या कारणावरून दोन व्यक्तींमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर झालेल्या वादातून ३० वर्षीय तरुणाचा खून झाल्याची घटना समोर आली आहे.
सदर बाजार पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बडी सडक परिसरात ही घटना घडल्याने शहरात एकच खबळ उडाली आहे. विष्णू राम सुपारकर असं मृत तरुणाचं नाव असल्याची माहिती समोर आली आहे. काल (गुरुवार) जालना शहरात श्रीराम जन्म उत्सावानिमित्त मोठ्या उत्साहात शोभा यात्रा काढण्यात आली.
या शोभा यात्रेत केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, अर्जुन खोतकर यांच्यासह शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला. दरम्यान बडी सडक परिसरातून ही शोभा यात्रा जात असताना दोन तरुणांमध्ये नाचण्याच्या करणावरून वाद झाला. या वादाचे रूपांतर पुढे हणामारीत झाले. यात एका तरुणावर धारदार चाकूने वार केल्याने त्याचा मृत्यू झाला आहे.
विष्णू राम सुपारकर या ३० वर्षीय तरुणाचा दुर्दवी मृत्यू झालाय. या घटनेनंतर शहरातील नागरिकांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात एकच गर्दी करत आरोपीला तात्काळ अटक करण्याची मागणी केली. तसेच पोलीस स्टेशनला घेरावा घातला. यामुळे पोलिस्टेशन आवारात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान या प्रकरणी सदर बाजर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पोलिसांच्या पथकाकडून आरोपीचा शोध सुरू आहे.