बीड – “तुला माझा नवरा खूप आवडतो का ? तू कशाला त्याला बोलती ? असे म्हणत एका महिलेस मारहाण करत विषारी द्रव पाजून तिला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे. ही घटना बीड जिल्ह्यात घडली आहेपाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार बीडच्या चाकुनाईक तांड्यावर ही घटना घडली.
सुनीता पंडित राठोड (वय 26, रा. चाकुनाईक तांडा, ता. गेवराई) असं मारहाण करून विषारी द्रव्य पाजलेल्या महिलेचे नाव आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीत ” तुला माझा नवरा खूप आवडतो का ? तू कशाला त्याला बोलती ? असे म्हणत त्यांना तिघांनी मारहाण केली. विषारी द्रव पाजून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान सुनीता राठोड यांच्या फिर्यादीवरून सविता जाधव, कविता जाधव आणि दत्ता जाधव या तिघांविरोधात बीडच्या गेवराई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाेलिस या घटनेचा कसून तपास करीत आहेत.