जालना – रुग्णालय म्हटलं की जिवदान देणारं मंदीरच आहे. परंतु, याच पवित्र मंदीरात महिलांसाबत अश्लिल चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. एखाद्याला रक्ताची गरज भासत असल्यास महिला देखील रक्ताच्या बॅगसाठी रक्तपेढीत जातात. परंतु, जिल्हा सामान्य रुग्णालयात जर महिला रक्ताची बॅग घेण्यासाठी जात असतील तर त्यांच्याही जिवाला धोका होऊ शकतो. त्यामुळे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने काय उपाय योजना केल्या जातात हेच पहावे लागणार आहे.
जालना शहरातील एका महिलेच्या पतीला सिकलसेलचा आजार आहे. त्यामुळे त्यांना सतत रक्त चढवण्याची गरज भासते. पतीच्या आजारपणामुळे सर्व जबाबदारी पत्नीवर आली. पती खाजगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्याला रक्त चढवणे गरजेचे असल्याने डॉक्टरांनी सदरील महिलेला रक्ताची बॅग घेऊन येण्यास सांगीतले. त्यामुळे ती जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या रक्तपेढीत गेली. तिथे मात्र रक्तपेढीचा कर्मचारी संशयीत ताकीत शेख याने महिलेच्या मनास लज्जा वाटेल असे कृत्य केले. तीचे गाल पकडून तु कीती सुंदर दिसतेस असे म्हणून तीचे गाल ओढून तीचा विनयभंग केला. त्यामुळे भयभीत झालेल्या महिलेने रुग्णालयातून पळ काढला. परंतु, संशयीत ताकीत शेख याने तीला वारंवावार फोन केले. रत्काची गरज असल्याने तीने पुन्हा रक्तपेढीत जावून बॅग घेतली आणि निघून गेली. त्यानंतर तिने हा सर्व प्रकार तीच्या नवर्याला सांगीतला.
नवर्याला रुग्णालयातून सुट्टी झाल्यानंतर तीने पोलीस ठाणे गाठले. परंतु, पिडीत महिलेवर दबाव टाकून गुन्हा दाखल होऊ दिला नाही. अखेर या प्रकरणी कदीम पोलीस ठाण्यात उशीराने गुन्हा दाखल करण्यात आलाय. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.