जालना – औद्योगीक वसाहतीमधील ओंकार इंटरप्रायजेस चे गोडावून फोडून सुमारे 6 लाख 20 हजार रुपयाचा ऐवज चोरुन नेणार्या चोरट्यांच्या चंदनझीरा पोलीसांनी मुसक्या आवळल्यात. त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.
जेटमल नगर येथील अलकेश नरेंद्र पहाडे यांना औद्योगीक वसाहतीमध्ये रोलींग मिल टाकायचे होते. त्यामुळे त्यांनी त्यासाठी लागणारे साहित्य औद्योगीक वसाहतीमध्ये भाडेतत्वावर घेतलेल्या गोडावून मध्ये ठेवले. परंतु, 10 संशयीत चोरट्यांनी गोडावून फोडून सुमारे 6 लाख 20 हजार रुपयाचा मुद्देमाल चोरुन नेला.
या प्रकरणी चंदनझीरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या चोरीचा तपास पोलीस निरीक्षक सम्राटसिंग राजपुत यांनी सुुरु केला आणि अवघ्या काही दिवसातच संशयीत आरोपीच्या मुसक्या आवळल्यात. सय्यद अफरोज सय्यद हसन, रा. सुदंरनगर बावलापार्क चंदनझिरा, बाबा ऊर्फ मनोज बापुजी खांजोळे, रा. संग्रामनगर चंदनझिरा, सुशिल फकिरबा मिसाळ, रा. चदंनझिरा, सय्यद करीम सय्यद ईस्माईल, रा. मदीना मस्जीद, चंदनझिरा, अजीज जमील मणीयार, रा. दुखीनगर जालना. यांना अटक करण्यात आली. तर लहु धोंडीराम पवार रा. सुदंरनगर, रामजानी ऊर्फ रामजनम बन्सबहादुर भारव्दाज रा. सिध्दीविनायकनगर, चंदनझिरा, शाम विष्णु सन्यांशी रा. सुदंननगर, राजु देवीदास ढेमरे रा. चंदनझिरा, लक्ष्मण बाबुराव लोहकरे रा. चंदनझिरा जालना हे संशयीत आरोपी फरार आहेत.