कुंभारी:-दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील ग्रामदैवत श्री गेनसिद्ध महाराज यात्रा उत्सवाचा दुसरा दिवस असून आज मोठ्या नंदीकोल काट्यांचा मिरवणूक असताना अवकाळी पावसाने हजेरी लावल्यामुळे कुंभारी व परिसरातील भक्तगणांना नंदीकोलचा उत्सव न पाहताच परतावे लागले. संध्याकाळी साडेआठ ते नऊ अवकाळी पावसाने हजेरी लावली थोडा पाऊस कमी झाल्यानंतर रात्री दहा वाजता नंदीकोल उत्सव सुरू झाला.
नंदीकोल उत्सवाची तयारी सुरू असतानाच अवकाळी पावसाने हजेरी लावली त्यामुळे बाहेरगावाहून आलेले भक्तगण उत्सव न पाहताच गावी परतले. अवकाळी पाऊस सुरू झाल्यामुळे भक्त महिल वर्ग पावसामुळे घरी परतले पावसामुळे पन्नास टक्के लोकही यात्रेत आले नाहीत. त्यामुळे यात्रेत विक्रेत्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले. यात्रेत हजारो लोकांची गर्दी होती. त्यामुळे आजचा हंगाम मोठ्या प्रमाणात होईल, अशी व्यापाऱ्यांना अशा होती परंतु, अवकाळी पावसाने पूर्ण यात्रा फोडली त्यामुळे हॉटेल व्यवसायिक, सरबतवाले, कलिंगड व्यवसाय, खेळणी व्यावसायिक, आईस्क्रीम विक्रेते, उसाचा रस विक्रेते, महिलांच्या सौंदर्यप्रसाधनाचे विक्रेते अशा सर्वच व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले.
अचानक आलेल्या पावसामुळे व्यापाऱ्याने आपला माल झाकणासाठी ताडपत्री झाकण्यासाठी त्यांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाले.