कुंभारी :- महाराष्ट्र शासन कृषी विभागामार्फत दक्षिण सोलापूर तालुका खरीप पूर्व तयारी आढावा बैठक बहुउद्देशीय सभागृह सोलापूर येथे संपन्न झाली.
दक्षिण तालुका कृषी अधिकारी रामचंद्र माळी यांनी पूर्व मशागत करताना खोल नांगरट करावी, पीक फेरपालट, सोयाबीन, उडीद,मूग, भुईमूग बियाणे कोणते वापरावे, बियाण्याची उगवण क्षमता कसे तपासावे तसेच खरीप हंगामात बियाणे व खते मुबलक प्रमाणात उपलब्ध होतील असे नियोजन केले आहे. बी बियाणे खत विक्रेत्यांनी शेतकऱ्यांना योग्य दरात व चांगल्या प्रतीची बियाणे व खते विक्री करावी गैरप्रकार आढळून आल्यास कडक कारवाई करण्यात येईल असे सांगितले.
यावेळी उपविभागीय कृषी अधिकारी राजकुमार मोरे, जिल्हा मृत्यू सर्वेक्षण व चाचणी अधिकारी भारत कटके, नायब तहसीलदार जितेंद्र मोरे, दत्तात्रय गायकवाड, उमेश काटे, कृषी सहाय्यक, निविष्ठा विक्रेते उपस्थित होते.
कृषी उपसंचालक राजकुमार मोरे यांनी शेतकऱ्यांचे उत्पादन वाढीसाठी कांदा बीज उत्पादन कार्यक्रम, सोयाबीन बियाणे उत्पादन साठी शेतकरी कंपनी काढले तर शेतकऱ्यांचे उत्पादन वाढणार असल्याचे सांगितले. नायब तहसीलदार जितेंद्र मोरे यांनी कृषी विभागाकडून शेतकऱ्यांना योग्य ते मार्गदर्शन करावे असे सांगितले.