भोकरदन : अबॅकस च्या माध्यमातून गणिताचे शिक्षण घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन सौ निर्मलाताई दानवे यांनी केले. भोकरदन येथील जी चॅम्प अबॅकस सेंटर द्वारे आयोजित राज्यस्तरीय बक्षीस वितरण समारंभ रामसुमती कॉम्प्लेक्स भोकरदन येथे आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री श्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या सुविद्य पत्नी व निर्मलाताई दानवे या होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून पाराशर शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन श्री संतोष इंगळे, शिवछत्रपती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री नारायण जीवरग, माजी नगराध्यक्षा सौ आशाताई माळी व सौ अर्चनाताई चिने , रामेश्वर सह. साखर कारखान्याच्या संचालिका सौ शोभाताई मतकर, डॉक्टर सौ माधुरी सोन्नी या होत्या.
यावेळी सौ दानवे म्हणाल्या की अबॅकस च्या माध्यमातून गणित हा विषय सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांना कसा अवगत करता येईल व विद्यार्थ्यांना गणित विषयाबद्दल असलेली भीती नाहीशी होऊन त्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल तसेच भविष्यात स्पर्धा परीक्षेसोबत पुढील शिक्षणासाठी याचा फायदा होईल. भोकरदन सारख्या ग्रामीण भागात सौ वर्षा औटी यांनी जी चॅम्प अबॅकस क्लासेस प्रथमच सुरू करून विद्यार्थ्यांना गणित विषयाची सोपी पद्धत उपलब्ध करून दिली याबद्दल देखील त्यांनी कौतुक केले. यावेळी सुपरस्टार विद्यार्थी कैवल्य कृष्णा कोकाटे याला स्मृतिचिन्ह मेडल व प्रमाणपत्र देण्यात आले तसेच प्रथम श्रेणीचे चार विद्यार्थी, द्वितीय श्रेणीचे तीन विद्यार्थी व तृतीय श्रेणी मधील वीस विद्यार्थ्यांना स्मृतिचिन्ह, मेडल व प्रमाणपत्र तसेच उत्तेजनार्थ दहा विद्यार्थ्यांना मेडल व प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते वाटप करण्यात आले.
यावेळी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने हजर होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन जी चॅम्प अबॅकस च्या संचालिका सौ वर्षा औटी यांनी केले