कुंभारी:-जोरदार वादळ-सुसाट दक्षिण तालुक्यासह परिसरात धुमाकूळ घातला. त्यात शेतकऱ्यांच्या फळझाडांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. अवकाळी पावसात वीज कोसळल्याने मुस्ती इयं ८ वर्षीय कु. लावण्या हनुमंता माशाळे या बालिकेचा अंत झालाय. ही हृदय द्रावक घटना दक्षिण सोलापूर तालुक्यातील मुस्ती येथे सायंकाळी चार वा. च्या सुमारास घडलीय घडलीय. याबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी ही, गेल्या दोन दिवसात जिल्ह्यात ढगाळ वातावरण आणि उन्हाची तीव्रता अधिक असल्याने कोणत्याही क्षणी अवकाळी पाऊस येण्याची चिन्ह दिसत होती. शनिवारी दुपारनंतर आभाळात ढगांनी प्रचंड गाठी केल्याने अगदी सायंकाळसारखा अंधार जाणवत होता. त्यातच सुटलेला जोरदार वारा जणू सोसाट्याच्या वाऱ्याचं रौद्ररूप धारण करून वाहू लागला होता. वादळ वारे आणि विजांचा कडकडाट अशातच दक्षिण तालुक्यातील अनेक गावांना अवकाळी पावसाने झोडपून काढले. त्याचवेळी सायंकाळी ०४ वा. च्या सुमारास मुस्ती इथं वीज कोसळून कुमारी लावण्या माशाळे ही आठ वर्षीय बालिका गंभीररीत्या जखमी झाली. तिला उपचारासाठी खाजगी इस्पितळात नेण्यात आलं तत्पूर्वी तिचा अंत झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. कु. लावण्या मुंबईतील चेंबूर परिसरात हनुमान मंदिर एफसीआय येथे तिच्या मात्यापित्यासह वास्तव्यास होती. तिच्या मावशीचे रविवारी 21 एप्रिल रोजी लग्न असल्याने, आजोळी आली होती. ती त्यांच्या घराच्या गच्चीवर ४-६ लेकरांसह खेळत होती. त्यावेळी ही दुर्दैवी घटना घडल्याचे सांगण्यात आले