कुंभारी:- दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग ग्रामपंचायकडून पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून बोरवेल केल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.
वळसंग येथे सार्वजनिक पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीचे पाणी कमी झाल्याने गेल्या महिनाभरापासून पाण्याची टंचाई झाली होती त्या अनुषंगाने वार्ड क्रमांक दोन मध्ये सरपंच जगदीश अंटद, उपसरपंच आरिफ कुरेशी, ग्रामपंचायत सदस्य समीर कटरे, शालम अमलीचुंगे, सिद्धाराम वाघमारे, सोमनाथ पाटील, गुलाब शेख, यासीन चेंडके, जिलानी बाबडे, चंद्रकांत मंजुळकर, रियाज भगीरे यांनी तातडीने बोरवेल मारले असता तीन इंच पाणी लागली असून त्या बोरवेल वरती मोटार बसून विधिवत पूजा करून पाणी काढले. तातडीने बोरवेल मारून पाण्याची उपलब्धता केल्याने नागरिकांमधून ग्रामपंचायत पदाधिकारी त्यांचे कौतुक केले जात आहे.