कुंभारी :- दक्षिण सोलापूर तालुक्यातील कुंभारी येथील नवसाला पावणारा ग्रामदैवत शंभू महादेव यात्रा गुरुवारी लहानकाठी नंदी कोल मिरवणुकीने सुरुवात झाली. तर रात्री अकरा वाजता अक्षदा सोहळा पार पडला त्यानंतर शोभेचे दारू काम उत्साहात पार पडले यावेळी गावातील महिला, पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते. शनिवारी रात्री नऊ वाजता मोठ्या भरलेले नंदी कोलाचा वीर तपस्वी मठापासून मिरवणुकीस प्रारंभ होणार आहे.
रविवारी सायंकाळी पाच वाजता जंगी कुस्त्याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच संध्याकाळी महाप्रसादाची सोय करण्यात आली आहे. सोमवार रात्री दहा वाजता सुंदर कन्नड पौराणिक नाटक यारदो हुव्वा यारदो मुडिगे सादर करण्यात येणार आहे. या यात्रेसाठी कुंभारी व पंचक्रोशीतील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन यात्रा पंच कमिटीचे अध्यक्ष सागर बिराजदार सचिव राम छपेकर यांनी केले आहे.