औरंगाबाद बिड राष्ट्रीय महामार्गावर सौंदलगाव शिवारात मंहत ऐतपुरी बाबा मंदीरासमोर तिहेरी आपघातात ४ जण जखमी झाले असून, जखमींना पाचोड जिल्हा औरंगाबाद येथील ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचार करून गंभीरीत्या जखमी झाल्याने औरंगाबाद येथे उपचारासाठी दाखल करण्यात येवून सदर हे जखमी कर्नाटक राज्यातील असल्याने त्यांची आरोग्य कर्मचाऱ्यांना भाषा समजली नसून तसेच गंभीरीत्या जखमी अवस्थेत असल्याने पुर्ण नाव समजु शकले नाही.
वडीगोद्री हुन पाचोड जात असलेल्या बँलोनो कार.के.ए. २५ एम बी. २५४६ कारने आयसर क्रमांक एम एच.१२ के. पी.,२२०८ या आयसरला मागुन वेगात ओव्हरटेक करण्याच्या नादात गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने महामार्गावरील दुभाजकला धडकली , आयसर पण दुभाजकाच्या मध्यभागी जाऊन उभे राहिले आयसरचे काहीही नुकसान झाले नाही.
घटनस्थळावरुन आयशर चालकाने पलायन केले तर बँलोनो कार महामार्गावरील दुभाजकला धडकुन दुसऱ्या बाजूने पाचोड हुन वडीगोद्रीकडे येणारी बस क्रमांक एम .एच.१४ बि.टी. १८४४ औरंगाबाद मुखेड समोरून धडक दिल्याने बसचे मोठयाप्रमाणात नुकसान होऊन चौघे जण गंभिरीत्या जखमी होऊन जखमींना आय आर बि च्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या रुग्णवाहिकेतुन पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता जखमींचे नावे, हुलगी अम्मा ,वय४०, काशिनाथ, वय ४५, श्रीदेवी, वय ५५,संपूर्ण नाव माहिती नाही, तसेच चौथ्या व्यक्तिचे नाव ही समजले नाही.
कर्नाटक राज्यातील असल्याने भाषा समजत नसल्यामुळे पुर्ण जखमींचे समजले नसल्याचे ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांनी सांगितले.
आपघात स्थळावरील कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी सर्व गाडया हलवून वाहतूक सुरळीत केले.
जखमींना औरंगाबाद येथे उपचार सुरू आहे सध्याच्या परिस्थिती काय आहे, माहिती मिळाली नसुन जखमी रुगणांचा पुर्ण तपशील पुर्ण नावे गोंदी पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांना माहिती नाही.