रोजच्या त्रासाला कंटाळून दोन मुलांनी बापाचा काठी व गजाने मारून खून केल्याची खळबळ जनक घटना वैजापूर तालुक्यातील धोंदलगाव येथे उघडकीस आली आहे. याप्रकरणी दोन्ही मुलांच्या विराेधात पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. दाेघांना पाेलिसांनी अटक केली आहे.
सतत दारू पिऊन येऊन आई, आजी-आजोबा आणि मुलांना वडील सतत मारहाण करीत, शिवीगाळ करत त्यामुळे अशा दररोजच्या जाचास कंटाळून दोन्ही मुलांनी आपल्या वडिलांचा खून केला. तसेच एका खोलीत पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला. नारायण रुस्तुम वाघ असे मयताचे नाव आहे.
या घटनेपुर्वी नारायण वाघ आणि त्यांच्या मुलांचे जोरात भांडण झाले. शेत वस्तीवर त्यांचा खून झाल्याचे काही ग्रामस्थांना आढळले. या घटनेत विकास नारायण वाघ, शुभम नारायण वाघ यांना पाेलिसांनी अटक केली आहे.
या दोन्ही संशयित आरोपींना वैजापूर न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक पवन राजपूत यांच्यासह पोलीसांचे पथक करीत आहे.