औरंगाबाद शहरातील सातारा परिसरातील एका शाळेत स्नेहसंमेलन सुरु असताना एकास बाजूला होण्यास सांगितले असता विद्यार्थीनीच्या वडिलांना मारहाण झाली. या घटनेच्या तक्रारीवरुन पाेलिसांनी युवकांवर गुन्हा दाखल केला.
पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार अक्षय उर्फ भैय्या, प्रशांत सुधाकर साने याच्यासह एक अल्पवयीन मुलाने तसेच काही अनोळखी व्यक्तींनी कडुबा राठाेड यांना मारहण केल्याची तक्रार राठाेड यांनी नाेंदवली. त्याची शहनिशा करुन संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.
राठाेड हे मुलीच्या शाळेत स्नेहसंमेलनासाठी गेले हाेते. तेथे त्यांनी कार्यक्रमास सुरु असताना एकास बाजूला होण्यास सांगितले. त्याचा राग मनात धरुन संबंधिताने इतर मित्रांना बोलावून घेत राठाेड यांना मारहाण करुन भोसकले. याप्रकरणी चौघांविरुद्ध सातारा पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती पाेलिसांनी दिली.
दरम्यान औरंगाबाद शहरात एका बीएफसीआय शाळेच्या आवारात दारू का पिऊ देत नाही म्हणून रात्रीच्या वेळी गुंडांनी शाळेतील वॉचमन असलेल्या तरुणांनी चाकूने वार केला आहे. या हल्ल्यामध्ये वॉचमन गंभीर जखमी झाला. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घ्यावी अशी मागणी नागिरकांनी तसेच शाळा व्यवस्थापनाने केली आहे.