जालना – येथील जिल्हा रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालयातील नर्स रूम मध्ये घुसून महिला कर्मचारी नर्स चा हात धरून शिविगाळ करूनओढाताड करत मारहाण करण्याचा प्रयत्न केल्याची घटना 9 च्या सुमारास घडली आहे. या घटने नंतर जिल्हा रुग्णालयातील डॉक्टर सह सर्व कर्मचाऱ्यानी रुग्णालयाच्या लॉबीत एकत्र येत जोरदार घोषणाबाजी करत काम बंद आंदोलनास सुरवात केली आहे.
आरोग्य कर्मचाऱ्याला शिविगाळ करून मारहाण करणाऱ्या व्यक्तीला तात्काळ अटक करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी काम बंद करून आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यानी केली आहे. कर्मचाऱ्यांनी अचानक पुकारलेल्या या आंदोलनामुळे इतर रुग्णाच्या उपचारावर यांचा परिणाम झाला असून त्यामुळे रुग्णाची गैरसोय झालीय.जो प्रयन्त या शिविगाळ करणाऱ्या नातेवाईकावर कारवाई केल्या जात नाही तो पर्यंत काम बंद आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी घेतला आहे.
दरम्यान, कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सय्यद मजहर, कैलास जावळे आदी घटनास्थळी दाखल झाले असून ते वैद्यकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची मध्यस्थी करीत आहेत. मात्र, वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या निर्यांयावर ठाम आहेत.
अॅप डाऊनलोड करा आणि जिंका बक्षिसं… कोणार होणार भाग्यवान विजेता…? आजच करा डाऊनलोड