जालना : लग्नाआधीच वधूचा माथेफिरू वरानं गळा चिरून केला खून केल्याची खळबळजनक घटना जालना जिल्ह्यातल्या बेलोरा गावात घडलीये. सुशील पवार असे या भावी नवरदेवाचे नाव आहे. मंठा तालुक्यातील बेलोरा गावातील 18 वर्षीय दीप्ती उर्फ कल्पना जाधव हिचे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील वरुड येथील एका तरुणासोबत 17 मार्च रोजी विवाह ठरला होता.
आज वधू आणि वर या पक्षांकडील मंडळी जालना येथे लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी आले होते. यावेळी वर असलेला तरुणही बस्ता बांधण्यासाठी सोबत आलेला होता, मात्र अचानक तो गायब झाला. या गायब झालेल्या तरुणाने थेट वधूचे गाव गाठले. घरी फक्त भावी वधू दीप्ती उर्फ कल्पना ही एकटीच होती. ती एकटीच असल्याची संधी साधत भावी वरानं तिचा गळा कापला. या घटनेत जागीच तिचा मृत्यू झाला. गावातील लोक जमा होताच खून करून आरोपी पसार झाला. दरम्यान घटनास्थळी सेवली पोलीस दाखल झाले असून पंचनामा सुरू आहे. या घटनेनंतर परीसरात संताप पसरला असून पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
त्या आरोपीच्या आई-वडील आणि नातेवाईकांना घरात कोंडून ठेवलेला आहे आणि गावातील नागरिकांनी त्या घराला घेराव टाकलेला आहे पोलीस घटनास्थळ पाऊस फाट्यास दाखल झालेली आहे
दरम्यान, ही घटना गावातील लोकांना समजताच लोक घराबाहेर जमा झाले. यावेळी खून करून आरोपी पसार झाला होता. दरम्यान घटनास्थळी सेवली पोलीस दाखल झाले असून पंचनामा करीत आहेत. दरम्यान, गावातील नागरिक संतप्त झाले असून त्यांनी आरोपीच्या कुटुंबियांना घरात कोंडून ठेवले असल्याची माहिती मिळाली आहे. तर घटनास्थळावर उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच मौजपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस फौज फाट्यासह दाखल झाले आहेत.