कोल्हापूर शहरातील आयडियल स्पोर्ट्स क्लबच्या गणेश मूर्तीवरील चांदीच्या दागिन्यांवर चोरट्याने दिवसाढवळ्या हात साफ केला. या घटनेचा राजवाडा पाेलीस कसून तपास करीत आहेत.
गणेशाेत्सवानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे आयडियल स्पोर्ट्स क्लब 9 फुटी गणेशाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करते. बाप्पांना पारंपारिक पद्धतीने चांदीचे दागिने देखील घालण्यात येतात. यंदा देखाली मंडळाने बाप्पांना अंलकार परिधान केले.
गणेशोत्सव असल्यामुळे रात्रभर या मंडळात कार्यकर्त्यांची रेलचेल होती. सकाळी मंडळातील कार्यकर्ते अंघोळीसाठी घरी गेले. हीच वेळ साधत चोरट्याने बाप्पांच्या अंगावरील अर्धा किलो चांदीचा हार लंपास केला. या प्रकरणी राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून स्थानिक पोलीस चोरट्याचा शोध घेत आहेत.