जालना तालुक्यातील सावरगाव शिवारात दरोडा टाकरण्याच्या तयारीत असलेल्या दरोडेखोरांच्या आज मौजपुरी पोलीसांनी मुसक्या आवळल्यात. पकडण्यात आलेले दरोडेखोर हे खूनाच्या गुन्ह्यासह इतर गंभीर गुन्ह्यातील आरोपी आहेत.
जालना जिल्ह्यात गणेशोत्सव सुरु असल्याने पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे सर्व पोलीस ठाण्याच्या अधिकार्यांना सतर्कपणे पेट्रोलिंग आदेश दिलेत. त्यामुळे मौजपुरी पोलीस देखील सक्रीय झालेत. मौजपुरी पोलीस ठाण्याचे सपोनि मिथुन घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि राकेश नेटके, पोलीस आंमलदार प्रदिप पाचरणे, अविनाश मांटे, धोंडीराम वाघमारे हे पेट्रोलिंग करीत होते. त्यांना सावरगाव शिवरात काही दरोडेखोर दरोडा टाकण्याच्या तयारीत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यामुळे मौजपुरी पोलीसांनी सावरगाव येथील ग्रामस्थांच्या मदतीने दरोडेखोरांचा सावरगाव शिवारात शोध सुरु केला. पोलीसांना व ग्रामस्थांना पाहून पाच दरोडेखोर हे मोटार सायकलवर बसुन हडप च्या दिशेने पळु लागले. त्यावेळी मौजपुरी पोलीसांनी ग्रामस्थांच्या मतदतीने त्यांचा पाठलाग केला. 5 दरोडेखोरापैक दोन दरोडेखोर हे मोटार सायकलसह पकडले. तर 3 दरोडेखोर हे पळून जाण्यात यशस्वी झाले.
पकडलेल्या आरोपीच्या ताब्यातून दरोड्याच्या साहीत्यासह इतर साधन पोलीसांनी ताब्यात घेतलेत. विशाल कालबल्या चव्हाण आणि गणेश नितीन चव्हाण दोन्ही रा. वाशिम असे पकडलेल्या दरोडेखोरांची नावे आहेत. आरोपी विशाल कालबल्या चव्हाण हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असुन त्याच्या विरोतध वाशिम जिल्ह्यात विविध पोलीस ठाण्यात खून, दरोडा, चोरी, चोरीचा प्रयत्न, घरफोडीचे एकुण 12 गंभीर गुन्हे दाखल आहेत. आरोपीस पकडल्याने जालना जिल्हा तसेच जिल्ह्याबाहेरील गंभीर गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीसांनी व्यक्त केलीय. या प्रकरणी मौजपुरी पोलीस ठाण्यात पकडलेल्या 2 आरोपीसह अन्य 3 आरोपीवर भारतीय दंड संहीतेच्या कलम 399, 402 गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यांना आज न्यायालयात हजर केले असता माननीय न्यायालाने त्यांना ’न्यायालयीन कोठडी सुणावलीय. या गुन्हयाचा तपास पोउपनि राकेश नेटके हे करीत आहेत. ही कारवाई पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे, उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश बुधवंत यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि मिथुन घुगे, पोउपनि राकेश नेटके , पोलीस अंमलदार अविनाश मांटे, प्रदिप पाचरणे, धोंडीराम वाघमारे, सदाशिव खेरे यांनी केलीय.





















