स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जालना शहरातील विविध ठिकाणी गावठी हातभट्टी दारु अड्यावर छापे मारुन तब्बल 5 लाख 98 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल नष्ठ करण्यात आलाय.
जालना शहरातील अवैध दारुविक्री व दारु तयार करणार्यांवर कार्यवाही करण्याच्या सुचना पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी दिल्या होत्या. त्यामुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रामेश्वर खनाळ यांनी वेगवेगळे पथके तयार करुन शहरातील गावठी हातभट्टी दारु तयार करुन विक्री करणार्यांवर कार्यवाही करण्याचे नियोजन केले होते. कैकाडी मोहल्ला, नुतनवसाहत, लोधी मोहल्ला भागात काही महीला व पुरुष गावठी हातभट्टया लावुन दारुची चोरटी विक्री करीत असल्याची माहिती पोलीसांना मिळाली होती. त्यावरुन पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी कैकाडी मोहल्ला व नुतनवसाहत भागात वेगवेगळया ठिकाणी एकाच वेळी छापे मारले. या छाप्यात कैकाडी मोहल्ला येथे दोन महीला, नुतनवसाहत येथे दोन पुरुष, लोधी मोहल्ला येथे एक पुरुष अशा एकूण 5 जनावर कारवाई केली. संशयीत आरोपीतांच्या घराची पाहणी केली असता घरात गावठी हातभट्टी दारू तयार करण्यासाठी भट्टी लावल्याचे दिसून आले. तसेच दारुसाठी लागणारे रसायन व दारु देखील आढळून आली.
सदर संशयीत आरोपीकडुन रसायन, प्लॉस्टिक व लोखंडी ड्रम, कॅन, चालु हातभट्टया व गावठी हातभट्टी दारु असा एकूण 5 लाख 98 हजार 200 रुपयाचा मुद्देमाल जप्त करुन नष्ट करण्यात आला. या प्रकरणी पोलीस ठाणे कदीम व सदरबाजार येथे महाराष्ट्र दारुबंदी कायदयाप्रमाणे (05) गुन्हे दाखल करण्यात आलेत. ही कारवाई कार्यवाही पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक, रामेश्वर खनाळ, सपोनि आशिष खांडेकर, पोउपनि प्रमोद बोंडले, पोउपनि राजेंद्र वाघ, सॅम्युअल कांबळे, गोकुळसिंग कायटे, फुलचंद हजारे, भाऊराव गायके, विनोद गडधे, राम पव्हरे, गोपाल गोशिक, संभाजी तनपुरे, कृष्णा तंगे, रुस्तुम जैवाळ, जगदीश बावणे, सचिन चौधरी, फुलचंद गव्हाणे, प्रशांत लोखंडे, रमेश राठोड, सतिष श्रीवास, इरशाद पटेल, अक्रुर धांडगे, किशोर पुंगळे, कैलास चे, भागवत खरात, रवि जाधव, योगेश सहाणे, सचिन राऊत, चालक धम्मपाल सुरडकर, रमेश पैठणे, महिला अंमलदार चंद्रकला शडमल्लु, रेणुका बांडे यांनी केली.