कुंभारी :- (निर्मला जवळे) संपर्क साधण्याचे साधन म्हणून मोबाईलचा फार मोठ्या प्रमाणात उपयोग असला तरी अनेक बाबतीतही मोबाईल उपयोगी पडत आहे. परंतु,याच्या अयोग्य ठिकाणी वापरामुळे मोबाईल जीव घेणे वस्तू सुद्धा बनत चालली आहे मोटरसायकल व प्रवासात मोबाईलचा वापरामुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे. याबद्दल जनजागृती करून कडक कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे.
आजच्या युगात मोबाईलचा वापर मोठ्या प्रमाणात दिसत आहे. यामुळे जग हे अतिशय जवळ आले असून संपर्क साधण्याचे महत्त्वाचे साधन मोबाईल असून याचा योग्य वापर केल्यास यापासून खूप चांगली कामे केली जातात व आपला वेळही वाचला जातो; परंतु दिवसेंदिवस मोबाईलचा अयोग्य वापर होत असल्यामुळे लहान मुलांमध्ये मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम घडवून येत असून शैक्षणिक क्षेत्रात सुद्धा मोबाईलच्या उपयोगामुळे प्रगती झाल्याचे दिसून आले आहे.परंतु या क्षेत्रात सुद्धा लहान मुलांना व मुलींना मोबाईल दिल्या गेल्यामुळे अनेक बालकांना डोळ्याचे आजार होत असले तरी त्याचा उपयोग करणे गरजेचे निर्माण झाले आहे. परंतु सध्या प्रवासात मोबाईल कानाला लावून बोलत प्रवास करणे चार चाकी व दुचाकी चालवताना तर मोबाईलचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्यामुळे प्रवास करताना जो कानाला लावून मोबाईलवर बोलत जातो त्याचा प्रवास तर धोक्याचाच होतो परंतु त्यापासून दुसऱ्या वाहनाला सुद्धा आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात धोका निर्माण होत आहे. तर बाजारात सुद्धा अनेक युवक युवती कानाला मोबाईल लावून आपली वाहने चालवत् असल्यामुळे दररोज लहान मोठे अपघात घडत असून याविषयी जनजागृती बरोबर कार्यवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे. अगोदरच रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाले असून मोबाईल कानाला धरून प्रवास करताना आपल्या बरोबर इतरांचा जीवह धोक्यात धोक्यात घालत आहेत. याकडे लक्ष् देण्याची गरज निर्माण झाली आहे.
मोबाईलच्या अयोग्य वापरामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून आपल्यामुळे इतरांचाही जीव धोक्यात येत आहे. अशा मोबाईल वापरकर्त्याविरुद्ध कडक कार्यवाही करण्याची गरज निर्माण झाली आहे. याविषयी जनजागृती करणे सुद्धा गरजेचे झाले आहे.