अक्कलकोट : कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) येथील उद्योगपती गुरुनाथ कटारे यांचे (२०१४) मध्ये कुंभारी घरकुल येथे खून झाले होते. याप्रकरणी तत्कालीन पोलीस उपआधीक्षक कृष्णकांत उपाध्याय यांनी तीन संशयित आरोपींना अटक केली होती.या तीनही आरोपींना उच्च न्यायालयाने (२०२३) मध्ये पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली होती.
मुख्य संशयित म्हणून माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे सुपुत्र रमेश पाटील यांचे नाव गोवले होते.त्यांनी (२०२३) मध्ये अक्कलकोट न्यायालयात स्वतः होऊन हजर झाले.त्यानंतर त्यांना सीआयडी कडे वर्ग करण्यात आले. सीआयडीने तपास पूर्ण करण्यास नऊ महिन्याचा काळ घालवल्याने त्यांचा सोलापूर येथील न्यायालयाने दिनांक १६ फेब्रुवारी रोजी सरकार पक्षातर्फे कुठलेही साक्षी,पुरावे उपलब्ध न झाल्याने त्यांची या खून खटल्यातून निर्दोष मुक्तता केली.
याप्रकरणी उच्च न्यायालयात महेश जेठमलानी यांनी तर सोलापूर न्यायालयात पाटील यांच्याकडून मिलिंद थोबडे,राजकुमार म्हात्रे यांनी काम पाहिले.अखेर सत्याचा विजय झाल्याचे मत माजी आमदार सिद्रामअप्पा पाटील यांनी यावेळी व्यक्त केले.रमेश पाटील यांचे राजकीय भवितव्य उज्वल असल्याने सूडबुद्धीने त्यांना या प्रकरणात गोवल्याचे मत सिद्रामप्पा पाटील यांनी व्यक्त केले.