जालना :- क्रीडा व युवक सेवा, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उपसंचालक क्रीडा व युवक सेवा, औरंगाबाद विभाग व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जालना यांच्यावतीने विभागस्तरीय शालेय थ्रोबॉल ( 14, 17, 19 वर्षाखालील मुले, मुली ) क्रीडा स्पर्धा -2022 या दि. 22 ते 23 डिसेंबर 2022 या कालावधीत जालना येथील अंकुशराव टोपे महाविद्यालयात आयोजित करण्यात आल्या आहे. विभागस्तरीय शालेय थ्रोबॉल ( 14, 17, 19 वर्षाखालील मुले, मुली ) क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन आज मत्स्योदरी शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ. बी. आर. गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी अंकुशराव टोपे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद पंडीत, उपप्राचार्य डॉ.संजय पाटील, डॉ. रमेश भुतेकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, डॉ. कैलास माने, क्रीडा विभागप्रमुख डॉ. भुजंग डावकर, डॉ. संजय शेळके, संघटनेचे अध्यक्ष प्रशांत नवगीरे, विजय गाडेकर आदि उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांचे महाविद्यालयाच्यावतीने स्वागत करण्यात आले. खेळाडूंना शुभेच्छा देताना प्राचार्य डॉ. मिलिंद पंडीत यांनी खेळाडूंना खेळाडूवृत्तीने खेळावे, खेळात हार- जीत होणारच असते त्यामुळे पराभुत झाल्यानंतर पुन्हा नव्या जोमाने सराव करून खेळत रहावे, असे सांगितले. विभागस्तरीय शालेय थ्रोबॉल ( 14, 17, 19 वर्षाखालील मुले, मुली ) क्रीडा स्पर्धांसाठी औरंगाबाद विभागातील औरंगाबाद, बीड, परभणी, हिगोंली या जिल्ह्यातील खेळाडू आलेले आहेत. यावेळी पंच म्हणून नरेंद्र मुंडे, अमोल बिचाले, शिवप्रसाद घुकसे, गणेश दराडे, गणेश बेटूदे यांनी काम पाहिले. सदर विभागस्तर शालेय थ्रोबॉल क्रीडा स्पर्धा 2022 जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर यांच्या मार्गदर्शनाखाली क्रीडा मार्गदर्शक मोहमद शेख, सिमोन निर्मळ इत्यादी परिश्रम घेत आहेत, असे जिल्हा क्रिडा अधिकारी यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.