कुंभारी :- कुंभारी गावास किमान तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात यावा, या मागणीसाठी कुंभारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह तहसीलदार,गटविकास अधिकारी यांच्याकडे गेल्या पंधरा दिवसापासून पदाधिकाऱ्यांनी पाणी टँकर मंजूर करावा यासाठी वेळोवेळी निवेदन दिले या निवेदनाची दखल घेत प्रशासनाने टंचाईग्रस्त कुंभारी गावास तीन टँकर मंजूर केले आहे.
आज मंगळवार रोजी सकाळी 11 वाजेच्या सुमारास तिन्ही टँकर पाणी भरून आल्यानंतर त्या पाण्याचे पूजन सरपंच श्रुती निकंबे, उपसरपंच राजशेखर कोरे, शिरीष पाटील, रामचंद्र होनराव यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ग्रामपंचायत सदस्य बिपिन करजोळे, आप्पासाहेब थोंटे, प्रकाश कटारे, नवनाथ काळे,इरेश कटारे उपस्थित होते. यावेळी ग्रामपंचायत पदाधिकारी व प्रशासनाने दर तीन दिवसाला दिले. यामुळे गावचा पाणी प्रश्न मिटला आहे. कुंभारी गावची लोकसंख्या तीस हजारच्या आसपास आहे. परंतु मागील महिन्यापासून रामपूर येथील पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरीने तळ गाठल्याने गावाला पाणीटंचाईचा सामना करावा लागत होता. पंधरा पंधरा दिवस नळाला पाणी येत नसल्याने माणसांसह जनावरांचा पाण्याचा प्रश्नही गंभीर बनला होता. त्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईचे चटके सहन करावा लागत होते. उशिरा का होईना जावा पिण्याच्या पाण्याचे टँकर मंजूर झाल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांसह ग्रामस्थ आनंदीत झाले आहेत.